वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक ; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई 

कोल्हापूर : एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेचे दागिने चोरून नेल्याची घटना कागल येथे घडली होती. वृद्ध महिलेचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मोरण प्रकाश सकट (वय 50) रा. रुई, ता. हातकणंगले असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून सुमारे 2 लाख 63 हजार 375 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोनगोळी (ता. निपाणी) येथील बेबीजान बशीर  नायकवडे नामक 61 वर्षाची वृद्ध महिला गावाकडे जाण्यासाठी कागल येथील एसटी बस स्थानकामध्ये आली होती. यावेळी या वृद्धेच्या बॅगेमधून पर्स चोरण्यात आली होती. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी ही घटना घडली होती. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याचा तपास कागल पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकासोबतच स्थानिक गुन्हे  अन्वेषण शाखा  करीत होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अंमलदार संदीप बेंद्रे व अशोक पवार यांना मोरन सकट ही महिला चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी हातकणंगले येथील रामलिंग फाट्यानजीक या महिलेला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. यावेळी तिची चौकशी केली असता कागल बस स्थानकामधून एका वृद्ध महिलेचा हार चोरल्याची कबुली तिने दिली. अधिक तपासासाठी या महिलेला कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

🤙 8080365706