कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू होणार : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे 

नागपूर : कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा सुरू करण्याला तत्वतः मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री कोकाटे यांनी ही माहिती दिली. 

फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी मध्ये 30 प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन निवास आणि शैक्षणिक सुविधा दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या आवश्यकता अधोरेखित करण्यात आले असल्याचे लेखी उत्तर कोकाटे यांनी यावेळी दिले. जुलै 1996 मध्ये राज्य सरकारने कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनी मध्ये कुस्ती व फुटबॉल निवासी प्रशिक्षण केंद्राला मंजुरी दिली काही वर्षानंतर फुटबॉल निवासी केंद्र पुणे क्रीडा प्रबोधिनी येथे स्थलांतरित करण्यात आले पुण्यामध्ये फुटबॉल केंद्र स्थलांतरित केल्यामुळे कोल्हापुरातील स्थानिक खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण अभावी राहावे लागत असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये म्हटले आहे.

पुढे बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, देशात तिसऱ्या क्रमांकाचा प्रेक्षकवर्ग असणाऱ्या आणि हजारो खेळाडूंची नोंदणी होणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून हे निवासी फुटबॉल केंद्र कोल्हापुरात पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. कोल्हापुरात निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या असा प्रश्न यावेळी क्षीरसागर यांनी उपस्थित केला.

🤙 8080365706