कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले व सुस्थितीत असावेत याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. यासाठी वारंवार महानगरपालिका प्रशासनासोबत बैठका, सुरु असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. कॉंग्रेस काळात बंद पडलेला महापालिकेचा डांबरी प्रकल्पही निधी देवून पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आला आहे. यामुळे महिना अखेर पर्यंत शहरातील रस्ते दर्जेदार आणि सुस्थितीत होतील, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आज महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर सन २०२५ – २६ मधून शिवाजी पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा निवृत्ती चौक ते बिनखांबी गणेश मंदिर या रस्त्यासाठी रु.४४ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ भागातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, गेल्या काही वर्षात रस्त्यांची झालेली दुरावस्था सुधारण्यात बऱ्याच अंशी यश आले आहे. नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या आरोग्यासाठी रस्ते सुस्थितीत असणे गरजेचेच आहे. खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरचे नांव बदनाम होत होते पण, गेल्या दोन महिन्यात घेतलेल्या आग्रही भुमिकेमुळे शहरातील रस्ते सुस्थितीत व दर्जेदार होताना दिसत आहेत. याकरिता विविध माध्यमातून निधीची तरतूदही करण्यात येत आहे. आगामी काळात शहरात दर्जेदार व सुस्थितीतील रस्ते देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, अजय इंगवले, प्रसाद चव्हाण, सुनील भोसले, विश्वदीप साळोखे, कपिल सरनाईक, युवराज अपराध, महेश कुलकर्णी, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, किशोर घाटगे, सौरभ कुलकर्णी, अवधूत पारगांवकर, मयूर पाटील, धीरज पाटील, आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
