स्मार्ट गडहिंग्लजसाठी एकदा संधी द्या : मंत्री हसन मुश्रीफ यांचे मतदारांना आवाहन

गडहिंग्लज : एका विशिष्ट विचाराचा पक्ष सत्तेत असल्यामुळे थैलीशाही आणि टक्केवारीची संघटना बळकट झाली. त्यामुळे गडहिंग्लजचा शाश्वत विकास रखडला आहे. यामुळे येत्या निवडणुकीत भाकरी परतण्याची वेळ आली असून स्मार्ट गडहिंग्लजसाठी राष्ट्रवादीला पूर्ण बहुमताने एकदा संधी द्या असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 

येथील नदीवेस भागात राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ, प्रभाग ९ चे नगरसेवक पदाचे उमेदवार रामगोंड उर्फ गुंडू पाटील, महिला उमेदवार दर्शना कुंभार यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उदयराव जोशी होते. सुरुवातीस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांनी स्वागत करत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी आपल्या भाषणात बोलताना मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, जनता दलाने शहरात एकही वैशिष्ट्यपूर्ण काम केले नसून शहराचे वाटोळे लावल्याची टीका केली. सुदैवाने प्रशासन काळात आम्ही जवळपास १५० कोटीचे कामे करून शहराला नवरूपात आणले आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीला एक हाती सत्ता मिळाली तर कल्पना करा की शहराला स्मार्ट बनवत सर्वसामान्य जनतेचे जगणे सुखकर होणार आहे. पालिकेच्या निवडणुकीत तळमळीने काम करणारी मंडळी उमेदवार म्हणून तुमच्याकडे मते मागायला येत आहेत. त्यांना आशीर्वाद देत धडपडणाऱ्या कार्यकर्ता म्हणून गुंडू पाटील आणि दर्शना कुंभार यांना विजयी करण्याचे आहवान त्यांनी यावेळी केले.

उमेदवार गुंडू पाटील बोलताना म्हणाले, गेल्या साडेचार वर्षात संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य आणि मंत्री मुश्रीफ त्यांच्या पाठबळावर केलेल्या कामाची यादी वाचत पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता मिळणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ, उदयराव जोशी यांची भाषणे झाली.

सभेला माजी नगरसेविका सावित्री पाटील, शशिकला पाटील, माजी नगरसेवक उदय पाटील, कबीर मुल्ला, यशवंत कुंभार, वसंत पाटील, तुकाराम कोरी, प्रकाश पवार, महेश कुंभार, सुरेश केसरकर, भारती कुंभार, रावसाहेब कुंभार, योगशिक्षक राम पाटील, भीमगोंड पाटील, चंद्रकांत कुंभार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील कुंभार समाजाला वीटभट्टीसाठी जागा देणार

मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, या प्रभागासह शहरातील कुंभार समाजाला वीटभट्टी आणि बगॅस ठेवण्यासाठी कायमस्वरूपी जागा देण्याचे नियोजन केले आहे. याबरोबर महिला बचत गटासाठी सभागृह, व्यायाम शाळा, ज्येष्ठांसाठी विरूंगळा केंद्र आदी कामे करण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

🤙 8080365706