गडहिंग्लजच्या विकासाला गती देणारा राष्ट्रवादीचा जाहीरनामा 

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरात साने गुरुजी वाचनालयाची नवी अद्यावत इमारत, सांस्कृतिक हॉल, नाट्यगृह, नगरपालिकेसाठी सुसज्य कार्यालय आणि सभागृह, व्यापारी संकुल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि रिंग रोड आदि प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन देणारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लजच्या विकासाला गती देणारा राष्ट्रवादीचा जाहीरनामा राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आला.

हा जाहीरनामा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ, शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, प्रचार प्रमुख सुरेश कोळकी, उदयराव जोशी, किरण कदम यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.

यावेळी बोलताना किरण कदम यांनी गडहिंग्लज शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी येत्या पाच वर्षात कोणत्याही परिस्थितीत रिंग रोडचा प्रश्न सोडवणारच आहोत. शहरात विविध ठिकाणी चुकीचे आरक्षण टाकण्यात आले आहेत ते रद्द करण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळावर वाटचाल करत असल्याने शहराच्या विकासाला वर्षाला किमान शंभर कोटी आणण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रचार प्रमुख सुरेश कोळकी यांनी सांगितले, पुढील पाच वर्षाच्या कामाचे नियोजन करून हा जाहीरनामा आपण प्रसिद्ध करत आहोत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवण्याचा मानस असून शहरात शाश्वत विकासासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. शहर अध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांनी पायाभूत सुविधा निश्चित करत मंत्री  मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज शहराच्या विकासाची पोकळी भरून काढण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. गोरगरिबांना घरकुल योजना राबवून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगत हा जाहीरनामा सत्यात उतरण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी रामदास कुराडे, भारत कोळेकर, अमरनाथ घुगरी, बाळासाहेब घुगरी, शर्मिली पोतदार, प्रशांत शिंदे, महेश गाडवी, संतोष कांबळे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

 

 

🤙 8080365706