नागरिकांच्या सहभागातून मुरगुडला आदर्श घडवणार : राजे समरजितसिंह घाटगे 

मुरगूड : मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आमची युती झाली आहे. राजकारण हे केवळ पदासाठी नसून विकासासाठी असते. मुरगूडचा विकास हा माझ्या मनातील आंतरिक तळमळ असून नागरिकांच्या सहभागातून मुरगूडला आदर्श घडवणार असे प्रतिपादन शाहु उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केले.

मुरगूड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. माधवनगर परिसरात मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारसभा पार पडल्या. त्याप्रसंगी घाटगे बोलत होते.

घाटगे म्हणाले, काम करण्यासाठी सत्तेची गरज असते. त्यामुळे युतीचा निर्णय घेतला. जनतेने ही संधी ओळखून विकासमार्गावर वाटचाल करण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मुरगूड शहरातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणी मिळावे. मुरगूड शहर स्वच्छ, आरोग्यदायी आणि आधुनिक पायाभूत सुविधा असलेले शहर व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या शहरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीतून कोट्यवधी रूपये निधी आणून विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी या निवडणुकीत पूर्ण बहुमत द्या.

याप्रसंगी गोकुळ माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, प्रा.चंद्रकांत जाधव, संताजी कारखाना कार्यकारी संचालक संजय घाटगे यांची भाषणे झाली.

यावेळी राजे बॅंक संचालक दतामामा खराडे,बिद्री संचालक सुनीलराज सुर्यवंशी,शाहु कृषी चेअरमन अनंत फर्नाडीस, संजय चौगले,विकास पाटील- कुरूकलीकर आदीसह असंख्य कार्यकर्ते हजर होते.

🤙 8080365706