महिला स्वावलंबनाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा ; नवोदिता घाटगे,आमरीन मुश्रीफ यांचे आवाहन

कागल : महिला स्वावलंबनासाठी त्यांना उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन,अर्थसहाय्य विक्री व्यवस्था असे सर्वतोपरी सहकार्य करू. नगरपालिका, राजमाता जिजाऊ व माऊली महिला संस्थेच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा. असे आवाहन राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे व माऊली महिला संस्थेच्या अध्यक्षा  आमरीन मुश्रीफ यांनी संयुक्तपणे केले. 

सोमवार पेठ व जयसिंगराव पार्क येथे राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित महिला प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

नवोदिता घाटगे म्हणाल्या,राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल शहरासह तालुक्यात महिलांना घरबसल्या उद्योग- व्यवसायासाठी विविध कार्यशाळांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. त्याचा फायदा अनेक महिलांना झाला आहे.आता नगरपालिकेची त्याला जोड झाल्यास यापेक्षा मोठ्या प्रमाणात काम करता येईल.

माऊली महिला संस्थेच्या अध्यक्षा आमरीन मुश्रीफ म्हणाल्या, वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली महिला संस्थेच्या माध्यमातून राबविलेल्या विविध उपक्रमांचा लाभ महिलांना झाला आहे. या कामाची व्याप्ती वाढवून महिलांना फायदा करून देण्यासाठी राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा.

यावेळी उमेदवार सविता माने,स्वरूपा जकाते,अमित पिष्टे,साधना पाटील,राजे बँकेच्या संचालिका नम्रता कुलकर्णी,अर्चना भोपळे,अर्चना रेळेकर,रंजना वासकर, पद्मजा भालभर यांनीही मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर शाहू साखर कारखान्याच्या संचालिका रेखाताई पाटील,मजी नगरसेविका सन्मती चौगुले,मंगल गुरव, आदी उपस्थित होत्या.

आता महिलांनी पुढे यावे

शहरातील एकूण मतदारांपैकी महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सविता माने यांच्या रूपाने एक उच्चशिक्षित नगराध्यक्ष कागलला लाभणार आहेत. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता महिलांनी पुढे यावे असे आवाहन उमेदवार साधना पाटील यांनी केले.

🤙 8080365706