मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्याच्या साहित्य संच वाटपाचा कागलमधून प्रारंभ

कागल, प्रतिनिधी :-सर्वसामान्य गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे सुख आणि समाधान मोठे आहे, असे भावनिक उद्गार मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याचे चक्क वेडच मला आहे, असेही ते म्हणाले.

कागलमध्ये नवीन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक साहित्य संच व सुरक्षितता साहित्य संचांचे वाटप मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. नवीन योजने अंतर्गत बांधकाम कामगारांना वाटावयाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या साहित्य संच वाटपाचा प्रारंभ कागलमधून झाला.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात. मला मात्र गोरगरिबांची सेवा आणि त्यांचे कल्याण करण्याचा छंद जडलेला आहे. कामगार कल्याण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. राज्य सरकारकडून एक रुपयाही न घेता बांधकाम कामगारांच्या जीवनाच कोटकल्याण केल्याचे समाधान मोठे आहे. एकट्या कागल विधानसभा मतदारसंघातच बांधकाम कामगारांच्या मुलांना केवळ शैक्षणिक शिष्यवृत्ती पोटी तब्बल ८९ कोटी रुपये मिळालेले आहेत.
श्री मुश्रीफ पुढे म्हणाले गोरगरीब गोरगरिबांची सेवा आणि कल्याण करण्याची तळमळच अंतकरणापासून असावी लागते. तात्पुरते ढोंग आणि देखावा करून एवढे मोठे काम उभे करता येत नाही. ही सेवा आणि ही तळमळ अव्याहतपणे मी 30-35 वर्षे जपली आहे. त्या सेवाभाव आणि तळमळीच्या भावनेतूनच निराधारांच्या पेन्शन वाढीबरोबरच आरोग्याचेही प्रचंड काम उभे केले.शेतकरी आत्मनिर्भर व्हावा…….!मंत्री श्री. मुश्रीफ भाषणात म्हणाले, शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे. तो आत्मनिर्भर होण्यासाठी शासनाने समिती नेमलेली आहे. कर्जमाफी योजनेमध्ये नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सवलत मिळायला हवी. दोन तीनदा थकबाकीमध्ये जाणाऱ्यांना लाभ मिळत असेल तर त्याची वस्तुस्थितीही तपासायला हवी. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याबरोबरच शेतकरी कर्जबाजारी होऊच नये यासाठीही उपाययोजना केल्या जाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, बिद्रीचे कारखान्याचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील, दलितमित्र बळवंतराव माने, प्रवीण काळबर, संजय चितारी, संजय ठाणेकर, सौरभ पाटील, अस्लम मुजावर, विवेक लोटे, नवाज मुश्रीफ, बच्चन कांबळे, प्रकाश सोनुले, राजु शानेदिवान, सुधाकर सोनुले, किरण पाटील, आदीप्रमुख उपस्थित होते.

स्वागत माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेची संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारी यांनी मानले.

बांधकाम कामगारांसाठी नव्याने सुरू झालेल्या अत्यावश्यक संच व सुरक्षितता संच या दोन साहित्य संच वाटपाचा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रताप उर्फ भैया माने, प्रकाशराव गाडेकर, प्रवीण काळबर, संजय चितारी आदी प्रमुख.
=========

🤙 8080365706