कोल्हापूर :-गणेश उत्सव म्हणजे प्रत्येकाच्या घरात आनंद, उत्साह आणि भक्तीभावाचा सण. या दिवशी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरी सर्व कुटुंबिय एकत्र येत उत्साहात गणरायाचे स्वागत केले. मंत्रोच्चार, धूप, दीप आणि विविध सुंगधी फुलांनी सजविलेल्या आसनावर श्रीगणेशाला विराजमान करण्यात आले.
नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरी आज श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्ष सौ वैशाली क्षीरसागर यांनी औक्षण ओवाळून श्री गणरायचे घरी विराजमान केले. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह कुटुंबियांनी मनोभावे बाप्पाची पूजा व आरती केली. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी, राज्यातील जनतेचे सर्व दुखः दूर करून त्यांना सुखी कर, असे साकडे घातले. यावेळी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, सौ. दिशा ऋतुराज क्षीरसागर, कु. कृष्णराज, कु. आदिराज आणि कुटुंबीय उपस्थित होते