कोल्हापूर: संपुर्ण राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सामान्य नागरिकां .प्रमाणेच विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले. पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात आणि साधेपणाने, आमदार सतेज पाटील यांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. गणरायांने संपूर्ण राज्यातील लोकांना आनंदी ठेवावे त्याशिवाय सर्वांची विघ्न दूर होवो. असे साकडेही त्यांनी गणरायाच्या चरणी घातले.
वर्षातून एक वेळ येणाऱ्या गणेशोत्सवाकडे सर्वांचे डोळे आतुरतेने लागलेले असतात. आज सकाळपासूनच गणेशाच्या आगमनाची सर्वत्र लगबग सुरु होती. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी आज सकाळी मंगलमय वातावरणात, बाप्पा विराजमान झाले. गणरायाचे आगमन घरी होताच, पाटील कुटुंबीयांनी मनोभावे पूजा केली. पारंपारिक पद्धतीने आणि साधेपणाने आमदार सतेज पाटील यांच्या घरी उत्साही वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या प्रतिष्ठापने नंतर, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी राज्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी गणरायाला साकडंही घातलं. आमदार सतेज पाटील यांनी मनोभावी प्रार्थना करत त्यांनी गणेशोत्सवा निमित्तानं जनतेला शुभेच्छा दिल्या. सर्वांची विघ्न गणराया दूर करू दे, असे साकडेही त्यांनी गणरायाला घातले.
यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, सौ वैजयंती संजय पाटील, सौ. शांतादेवी डी.पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, सौ पूजा ऋतुराज पाटील, डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील, देवश्री सतेज पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते.