कोल्हापूर – प्रतिनिधी – राजारामपुरी येथील उत्तम उत्तुरे फौंडेशन व शिवसेना ठाकरे गट जिल्हा महिला आघाडी यांच्यावतीने सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, उद्योजक महेश उत्तुरे प्रमुख उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते अनुक्रमे व कंसात रक्कम – १) रोहन मोहन हातकर (११ हजार रुपये), २) ऋतुराज रामचंद्र तांबेकर (५ हजार रुपये), ३) अनुराग विजय घोरपडे (३ हजार रुपये). उत्तेजनार्थ गौरव प्रताप रोकडे व रोहन सचिन कांबळे यांना देण्यात आले. तसेच सर्वच स्पर्धकांना चांदीची अंबाबाईची प्रतिमा व प्रमाणपत्र देण्यात आले.
शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, उद्योजक महेश उत्तुरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सागर बगाडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे असलम सय्यद, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, मंजीत माने, सनराज शिंदे, अनिल कदम, संग्राम निंबाळकर, रीमा देशपांडे, अमृता जाधव, विद्या गायकवाड, शिल्पा संकपाळ, माधुरी जाधव, माधवी लोणारे, शुभांगी साळुंखे, कृष्णा जाधव, उमेश उत्तुरे, सचिन उत्तुरे उपस्थित होते.
कोल्हापूर – उत्तम उत्तुरे फौंडेशन व शिवसेना ठाकरे गट जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट बक्षीस वितरण प्रसंगी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, संजय पवार, रविकिरण इंगवले यांच्यासह इतर.
………………………………