कोल्हापूर :-आयुष दाभोळे या शालेय संशोधकाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

कोल्हापूर :-अवघ्या पंधरा-सोळा वर्षाच्या आयुष संजय दाभोळे या शालेय संशोधकाच्या संशोधनाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेवून त्याचा गौरव केला आहे. त्याने ‘ऑप्टिमम इनव्हिजिबिलिटी सेटअप बेस्ड ऑन द रोचेस्टर क्लोक’ या विषयावर प्रयोगात्मक संशोधन केले आहे. या त्याच्या प्रयोगावरील शोधप्रबंध ‘इंडियन जर्नल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’ यामध्ये प्रकाशित झाला आहे. त्याने अगदी साध्या व कमी खर्चाच्या साहित्यासह हा प्रयोग यशस्वी केला आहे. आयुष हा कोल्हापूरमधील विबग्योर हायस्कूलमध्ये दहावीत शिकतो. या प्रयोगातून मेडिकल क्षेत्रातील अवघड प्रक्रियांसाठी डाॅक्टरना मदत होईल असे एखादे उपकरण विकसित करण्याचा आणि फिजिक्समध्ये मुलभूत संशोधन करण्याचा मानस आयुषने बोलून दाखवला.

आयुषने हे काम करण्यासाठी सखोल अभ्यास करत खूप मेहनत घेतली आहे असे त्याचे वडील व न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी अभिमानाने सांगितले.
विशेष म्हणजे, आयुष हा लेखक असून त्याने लिहिलेल्या “द विंटर पाल्स” या पुस्तकाचा नॅशनल यंग ऑथर्स फेअर २०२४ मध्ये गौरव झाला आहे. हे पुस्तक ॲमॅझाॅनवर उपलब्ध आहे. तो ब्रिबुक्स टाइम्स मध्ये पत्रकार म्हणूनही काम करतो. त्यांचे अनेक कवितांचे लेखन All Poetry या वेबसाइटवर प्रकाशित झाले आहे.
शालेय वयात तो लेखक, कवी आणि संशोधक अशा उल्लेखनीय यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

🤙 9921334545