कोल्हापूर: महादेवी हत्तीनीला परत पाठवण्याच वनतारान जाहीर केले. यामध्ये, विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांचे मोठे योगदान राहिले आहे. याबद्दल नांदणीच्या नागरिकांनी आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयावर भेट घेऊन, त्यांचे आभार मानले.
नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला परत पाठवण्याचे वनताराने जाहीर केले. यानंतर नांदणी गावाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने, वनताराच्या या भूमिकेच स्वागत करण्यात येते. तर महादेवी हत्तीनीला परत आणण्याकरिता, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी देखील जन आंदोलन उभारले होते. महादेवीला परत आणण्यासाठी गुगलच्या माध्यमातून, जमा करण्यात आलेले दोन लाखाहून अधिक अर्ज आमदार सतेज पाटील यांनी महामहीम राष्ट्रपतींच्याकडे पाठवले होते. ज्यावेळी महादेवी हत्तीनीला वनतारा येथे नेण्याचा निर्णय झाला, त्यावेळी पासून सातत्याने आमदार सतेज पाटील या विरोधात भूमिका मांडत आहेत. या सर्व घडामोडी पाहता, वनतारा प्रशासनाने आता महादेवी हत्तीनीला परत नांदणीला पाठवण्याचे जाहीर केले. यामध्ये आमदार सतेज पाटील यांचे योगदान मोठ असून त्याबद्दल, नांदणी गावातील नागरिकांच्या वतीने, आमदार सतेज पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात आले. नांदणी गावातील नागरिकांनी आमदार सतेज पाटील यांची अजिंक्यतारा कार्यालयावर भेट घेतली.
महादेवीला परत आणण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी सातत्याने जी भूमिका मांडली, त्याचेच हे यश असल्याच्या भावनाही यावेळी नांदणीच्या नागरिकांनी व्यक्त केल्या. यावेळी दत्त कारखान्याचे संचालक शंकर पाटील, आण्णासो पाटील नांदणी ग्रामपंचायत सदस्य शितल उपाध्ये दीपक कांबळे महावीर खंजीरे माजी उपसरपंच महेश परीट, शुभम अनुसे विनायक चौगुले सत्तार पटेल संकेत काळे मानतेश जुगळे यांच्यासह नांदणी गावातील नागरिक उपस्थित होते.