जिल्ह्यात राष्ट्रवादीत पक्षप्रवेश घ्यावेत, मात्र निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही याची वरिष्ठांनी काळजी घ्यावी :- माजी आमदार राजेश पाटील

कोल्हापूर : राधानगरी, करवीर मतदार संघात ना. हसन मुश्रीफ अनेकांचे पक्षप्रवेश करून घेत आहेत. हे पक्षप्रवेश घ्यावेत. मात्र, त्यासाठी निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये, याची काळजी वरिष्ठांनी  घ्यावी, असे मत माजी आमदार राजेश पाटील यांनी मेळाव्यात बोलू दाखवले.

 

मतदार संघातील चंदगड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी महागाव (ता. गडहिंग्लज) येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, मला राज्याचे कोणते पद नको, मात्र आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, याची खबरदारी मुश्रीफांनी घ्यावी. सीमाभागासाठी शिनोळी येथे केंद्र मागितले होते; मात्र हे केंद्र सरोळी येथे करण्याचा घाट घालण्यात आला आहे. याला विरोध करणार असून, विद्यापीठाने यात गांभीयनि लक्ष घालावे.
आम्ही स्वाभिमानी आहोत. विधानसभेवेळी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास कमी पडलोही असेल. मात्र, पक्ष बांधणीत कुठेच कमी पडलो नाही. यापुढेही कमी पडणार नसल्याचे स्पष्ट केले, असेही ते म्हणाले.
जयसिंग चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी बाबासाहेब पाटील, अनिल साळोखे, भैया माने, नितीन दिंडे, शिवानंद उंबरवाडी, जयसिंग चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली.
*शिवाजी पाटलांची दिलगिरी की धमकी ?*
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करतानाची भाषा धमकीची असल्याने त्यांनी विरोधकांची दिलगिरी व्यक्त केली की, विरोधकांना समज दिली? चंदगड मतदार संघात हे असेच चालू राहिले, तर मतदार संघाचे भवितव्य कठीण आहे, असेही पाटील म्हणाले.
शक्तिपीठ मार्ग चंदगडकरांना हवा असेल तर त्यांनी घ्यावा, असे वक्तव्य कागलकरांनी करणे दुर्दैवी असून, एकदा विरोध करायचे ठरवले तर तो मनापासून करा, असे ते म्हणाले
महादेवी हत्तीण नेण्यास जेवढी लगबग वनताराने दाखविली, तेवढीच चंदगड मतदार संघातील हत्ती, गवे, डुकरे न्यावीत. म्हणजे या भागातील शेतकरी किमान रात्री शांतपणे झोपतील. या प्राण्यांचा उपद्रव ‘पेटा’ला दिसत नाही का, असा सवालही राजेश पाटील यांनी यावेळी केला.

🤙 9921334545