कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय सदाशिवराव मंडलिक यांची तर उपाध्यक्षपदी अमित देसाई यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड झाली. ही निवड पाच वर्षांसाठी आहे.
अध्यक्ष पदासाठी मंडलिक यांचे नाव संचालक भाऊसो देसाई यांनी सुचविले. त्याला विजय पोळ यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी देसाई यांचे नाव प्रवीण सूर्यवंशी यांनी सूचविले, तर त्याला सुहास बोंद्रे यांनी अनुमोदन दिले.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक एकच नाव आल्याने अध्यासी अधिकारी मिलिंद ओतारी यांनी निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
सहकार पंढरी
म्हणून ओळखण्यात येणाऱ्या कोल्हापुरात सहकार संघाची नवीन अद्ययावत इमारत उभा करून संस्थेच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येईल. सहकार चळवळीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल. कोल्हापुरात राज्यव्यापी सहकार परिषद घेण्यात येईल, असे मंडलिक यांनी सांगितले.
बैठकीस संभाजी तांबेकर, निळकंठ ठाकूर, उपप्राचार्य संभाजी जाधव, शकुंतला गोधडे, कृष्णात पाटील, संभाजी पाटील, प्रवीण सूर्यवंशी आदी उपथित होते.