कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार क्षीरसागर यांची भेट घेऊन मानले आभार.. शिवसेनेकडून साखरपेढे वाटून आनंदोत्सव

कोल्हापूर दि. ०२ : गेली अनेक वर्ष सातत्याने सुरू असलेल्या वकील संघटना तसेच पक्षकारांच्या लढ्याला यश आले आणि काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी १८ ऑगस्ट पासून कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच ची सुरुवात होत असल्याची अधिसूचना जाहीर केली.

मंजूर झालेल्या सर्किट बेंच मुळे कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार असून, त्यामुळे रोजगार निर्मितीसह इतर क्षेत्रांनाही चालना मिळणार आहे. त्यामुळे सर्किट बेंच मुळे कोल्हापूरच्या विकासात मोलाची भर पडेल. सर्किट बेंच मंजुरी हा वकिलांच्या एकजूटीचा विजय असून, आगामी काळात कायमस्वरूपी खंडपीठासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. कोल्हापूरसाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असून आज कोल्हापुरातील जेष्ठ विधीज्ञ आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन करून आभार मानले. शिष्ठमंडळाने आज शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून पेढा भरवून आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हा व शहर कार्यकारणीच्या वतीने साखर पेठे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्रीती जाधव, माजी महापौर अॅड.महादेवराव आडगुळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, अॅड.व्ही.आर. पाटील, अॅड. अजित मोहिते, अॅड.इंद्रजीत चव्हाण, अॅड.शिवाजी राणे, अॅड.गिरीश खडके, अॅड.रणजीत गावडे, अॅड.आर.एल.चव्हाण, अॅड.संपत पवार, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, महानगरसमन्वयक कमलाकर जगदाळे, शिवसेना महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, महानगरसमन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, शिवउद्योग सेना महिला आघाडी संघटक मंगलताई कुलकर्णी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545