राहुल आणि राजेश पाटील यांची भूमिका, दुर्दैवी; मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेस पक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत; कार्यकर्त्यांनी मेळाव्यात व्यक्त केल्या तीव्र भावना*

कोल्हापूर::-राहुल आणि राजेश पाटील यांनी घेतलेली भूमिका, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेस पक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहोत. असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. वडणगे शिये आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा आज काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

आज शनिवारी वडणगे, शिये आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा काँग्रेस कमिटीत झाला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्यचे अधीच ठरल होत, मग आमच्यावर ठपका कशाला ठेवता असे सांगत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पक्ष सोडताना अडचण सांगता, तुम्हाला असली कसली अडचण पडली की गेल्या तीन दशकांपासून एकनिष्ठ असणारी माणसे सोडून तुम्ही निघालात, या शब्दांत कार्यकर्त्यांनी राहुल पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. कार्यकर्त्यांच्या मनोगत नंतर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, कोल्हापूर जिल्हा पहिल्यापासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिला आहे. सत्ता असो वा नसो येथील जनतेन नेहमीच काँग्रेस विचारधारा जोपासली आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसमधील बहुतांश मंडळी राष्ट्रवादीत गेली. अशा काळात स्व.पी.एन. पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेसचा अभेद्य गड लढवला. २० वर्षे ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांचे पक्षासाठीचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. अशा शब्दांत आम. सतेज पाटील यांनी पी.एन. यांच्या एकनिष्ठतेचे कौतुक केले. पी.एन. आज असते तर असा वेगळा निर्णय झाला असता का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राहुल आणि राजेश पाटील यांनी, जाऊ नये यासाठी मी प्रयत्न केले. पक्षाचे वरिष्ठही त्यांच्याशी बोलले. त्यांनी अजूनही पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये. असे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केले. राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाच तर करवीर मतदारसंघात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी माझ्यावर जबाबदारी आहे. तशी भूमिका घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मला पक्षासाठी लढाई लढावी लागेल. असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, संजय पाटील वाकरेकर या कार्यकर्त्यांनी, ज्यांना सत्तेच्या लाभाशिवाय जमत नाही असे लोकच पक्ष सोडून दुसरीकडे निघाले आहेत, जे पक्षाशी एकनिष्ठ आहेत ते पक्षासोबतच आहेत. जे पक्ष सोडून जात आहे ते लाभार्थी आहेत. अशा शब्दांत त्यांनी पक्ष सोडणाऱ्यांना सुनावले. यावेळी, बाजार समितीचे माजी सभापती दशरथ माने, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, पांडुरंग पाटील, रामकृष्ण पाटील, प्रकाश लाड, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अमर पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश पाटील, बाबासो माने आदींनी मनोगत व्यक्त करत शेवटच्या श्वासा पर्यंत, काँग्रेस पक्ष आणि आमदार सतेज पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. या मेळाव्याला एम जी पाटील शिवाजी गायकवाड संपत दळवी महेश पाटील प्रभाकर पाटील विश्वास कामीरकर शरद निगडे राम पाटील जालींदर पोवार बाबासो पाटील सचिन चौगले विकास चौगले बबनराव शिंदे युवराज पाटील यांच्यासह वडणगे शिये आणि शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545