कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू होणार – आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार

कोल्हापूर | दिनांक १ ऑगस्ट २०२५ :कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याचा दीर्घकालीन आणि महत्त्वाचा निर्णय अखेर काल जाहीर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली असून, त्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील नागरिकांना न्यायासाठी मुंबईला प्रवास करण्याची गरज भासणार नाही

.

या ऐतिहासिक निर्णयानंतर, स्टेट यंग लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. चेतन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजेशजी क्षीरसागर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. खंडपीठ स्थापन करण्यासाठी त्यांनी सातत्याने विधानसभेत आवाज उठवला होता तसेच विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला होता. त्यांच्या या योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला.

सत्कार कार्यक्रमात अ‍ॅड. यश गुजर, अ‍ॅड. सर्वेश भांदीगरे, अ‍ॅड. निखिल मुढगल, अ‍ॅड. अमित साळुंखे, अ‍ॅड. पृथ्वी बेंदके, अ‍ॅड. सातवशील माने, अ‍ॅड. आदित्य अरेकर, अ‍ॅड. अभिषेक देवकर, अ‍ॅड. सलमान मालदार,अ‍ॅड. ओंकार शेवडे, अ‍ॅड. धैर्यशील गोंधळी, अ‍ॅड. ऋषिकेश मोरे, अ‍ॅड. ऋषिकेश जाधव आणि अ‍ॅड. अमर सर्वे हेही उपस्थित होते.

या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील न्यायिक क्षेत्राला मोठा आधार मिळणार असून, स्थानिक जनतेसाठीही हा निर्णय ऐतिहासिक आणि सुखद ठरणार आहे.

🤙 9921334545