कोल्हापूर :महादेवीच्या घरवापसीसाठी आ.सतेज पाटील यांचा पुढाकार; सत्वा दोन लाखांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षरी

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीणीची गुजरातमधील वनताराकडे रवानगी करण्यात आल्यानंतर मोठा जनाक्रोश सुरु झाला.काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सुरुवाती पासूनच महादेवीला वनतारा मध्ये पाठवण्याला विरोध केला.आमदार सतेज पाटील यांनी जनभावनेचा विचार करुन राज्य सरकारने या प्रकरणी न्यायालयात बाजू मांडावी अशी मागणी केली होती.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया मध्ये राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून देशभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. अवघ्या तीन दिवसांतच या देशव्यापी मोहिमे मध्ये दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी स्वाक्षरी केल्या. आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नांदणीच्या जैन मठात स्वस्तिीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या हस्ते स्वाक्षरी अर्जांचे पूजन करण्यात आले.यावेळी महास्वामीजींनी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मोहिमेला यशसिद्धी प्राप्त होऊ दे असे आशीर्वाद दिले. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महादेवीला परत आणण्यासाठी सर्वांची एकजूट अशीच कायम ठेऊया असं आवाहन केले यावेळी दत्त समुहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, शिरोळचे माजी उपनगराध्यक्ष तातोबा पाटील, राहुल खंजिरे, शशिकांत खोत, सागर शंभूशेटे, नितीन बागे, महेश परीट, दीपक कांबळे, शीतल उपाध्ये, महंतेश जुगळे ,राजू मोगलाडे विजय पाटील, विजय चौगले, सुदर्शन खोत, नितीन बागे, अनिल पाटील, दिपक मगदूम, सचिन चौगले, धुळगोंडा पाटील, रामगोंडा पाटील, राजू वळीवळे, शितल खोत, सुनिल पाटील यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545