कोल्हापूर:-जिद्दीच्या पायावर’ या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

कोल्हापूर दक्षिण: प्रतिनिधी ई साहित्य प्रतिष्ठान आणि हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ विद्यामंदिर, उंचगाव पूर्व येथे शाळेच्या ग्रंथपाल अंजना लगस यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारित हे पुस्तक लेखिका व समाजसेविका जयश्री पटवर्धन यांनी लिहिलेल्या “जिद्दीच्या पायावर” या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.


प्रास्ताविक परशुराम माईनकर यांनी केले.
लेखिका जयश्री पटवर्धन यांचा परिचय विभावरी सावंत यांनी करून दिला आणि त्यांचे स्वागत नववीतील समिता मांढरे हिने केले. प्रकाशक सुनीळ सामंत यांचा परिचय मुख्याध्यापक मनोज शेडगे यांनी केला व स्वागत स्वराज्य खोत (इ. ८ वी) याच्या हस्ते झाले.
माइंड ट्रेनर विठ्ठल कोतेकर यांनी अंजनाला “पुढे चालत राहा – थांबू नकोस!” असा प्रेरणादायी संदेश दिला. उपाध्यक्ष श्री. मनोहर देशभ्रतार, सचिव रेखा देसाई आणि अध्यक्ष अभिजीत गारे यांनी अंजनाच्या कार्याबद्दल कौतुक करत विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले.

अंजनाने आपल्या भाषणात सर्व शिक्षक, मार्गदर्शक, कुटुंबीय, संस्थेचे पदाधिकारी आणि वाचकांचे मनापासून आभार मानले. “हे पुस्तक वाचून मिळणाऱ्या प्रतिक्रिया मला नव्या उमेदीनं पुढे जाण्याचं बळ देतील.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुग्धा गोरे लिंगनूरकर यांनी केले तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापिका सौ. स्वाती उपाध्ये यांनी केले.

कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त तानाजी देसाई, अंजनाचे कुटुंबीय, हितचिंतक, माजी विद्यार्थी, लेखिका गायत्री साळवणकर, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळ:‘जिद्दीच्या पायावर’ या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न यावेळी मान्यवर

🤙 9921334545