कोल्हापूर दक्षिण: प्रतिनिधीउचगाव येथील अंगणवाडी केंद्र ९२ मध्ये मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान कार्यक्रमअंतर्गत कमी वजनाच्या बालकांना पौष्टिक शिदोरी वाटप करण्यात आली. पालकांना बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले .
प्रास्ताविक पर्यवेक्षिका मनीषा गायकवाड यांनी केले. किशोरी मुलींना डॉ. दिपाली बसुगडे व आरोग्य सेविका सुवर्णा तांबेकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुतार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विशेष सेविका पद्मजा माने, दिपाली जाधव, मीना पवार, रेखा पाटील, महादेवी स्वामी, मदतनीस उज्वला दळवी, ललिता ढोलताडे, त्याचबरोबर उंचगाव मधील सर्व सेविका मदतनीस उपस्थित होत्या. आभार सेविका स्नेहल सांगलीकर यांनी मानले.
फोटो ओळ: उचगावात अंगणवाडी केंद्र येथे बालकांना पौष्टिक शिदोरी वाटप प्रसंगी पर्यवेक्षिका मनिषा गायकवाड, स्नेहल सांगलीकर यांच्यासह सेविका मदतनीस आदी.