कोल्हापूर :एनआयटी येथे भारत सरकारचा रोजगार मेळावा संपन्न

कोल्हापूर (उंचगाव ):भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालय अंतर्गत नॅशनल करिअर सर्व्हिस (एनसीएस) आणि न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने एनआयटी उंचगाव येथे रोजगार मेळावा संपन्न झाला. 

पुणे येथील जाॅन डिअर, भारत फोर्ज, एसीएस इंडस्ट्रीज, खोपोली येथील मार्कसन फार्मा आणि कोल्हापूर येथील मेनन पिस्टन्स व चेतन मोट*र्स या कंपन्यांनी ८६ मधून ४७ उमेदवारांची निवड केली. यामध्ये टेक्निकल, अकाऊंट, ऑफिस क्लार्क, मार्केटिंग अशा जागांचा समावेश आहे. मेळाव्याच्या आयोजनासाठी एनसीएसच्या यंग प्रोफेशनल मेघना वाघ, एनआयटीचे टिपीओ प्रा. किरण वळीवडे व अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील व एनआयटी संचालक डाॅ. संजय दाभोळे यांचे मेळाव्यासाठी मार्गदर्शन लाभले.

🤙 9921334545