कोल्हापुरी चप्पल व कारागिरांना योग्य सन्मान मिळवून देईन : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : इटली येथील आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये प्रसिद्ध ब्रँड प्राडा यांनी सादर केलेले सँडल्स हे आपल्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पलेची सरळ नक्कल आहेत. ही चप्पल लाखोंच्या किमतीत विकली जात आहे. मात्र दुर्दैव म्हणजे त्यांनी ‘कोल्हापूर’ या परंपरेचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा येथील स्थानिक कारागिरांच्या मेहनतीला कोणता ही सन्मान दिलेला नाही. ही घटना निषेधार्थ आहे.

या प्रकरणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन यावरती त्वरित कार्यवाही करावी असे लेखी निवेदन दिले आहे.
या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्थानिक वारसा आणि कारागीरांचे हक्क अबाधित राहतील यासाठी मी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीव राज्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणावर चर्चा करेन व कोल्हापुरी चप्पल व कारागिरांना योग्य सन्मान मिळवून देईन असा शब्द खा. महाडिक यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मा. संजय शेटे,  धनंजय दुग्गे, मानद सचिव अजित कोठारी, खजानीस मा. राहुल नष्टे, संचालक संपत पाटील, ऑफिस सेक्रेटरी मा. प्रभाकर पाटील यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545