सरकारच्या विरोधात 10 तारखेला सांगली पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : अलमट्टी धरण उंचीवाढ समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीमध्ये आमदार अरूणआण्णा लाड, माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील उपस्थितीत होते.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं 21 मे रोजी मंत्रालयात बैठक घेवून पंधरा दिवसांत पुन्हा बैठक घेवू असं आश्वासन दिल्यानंतरही पावसाळा सुरु झाला तरी अद्याप बैठक घेतली नसल्यानं, येत्या 10 तारखेला सांगली पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा अलमट्टी विरोधी संघर्ष समितीच्या वतीने दिला.

शिवसेनेचे विजयराव देवणे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, माजी सभापती बाबासाहेब देवकर, सर्जेराव पाटील, गिरीष फोंडे, राजू सुर्यवंशी, दिपक पाटील, शिवाजी मुगदूम यांच्यासह अलमट्टी विरोधी कृतीसमितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545