कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची सदस्य नोंदणी पंधरा हजार सदस्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे नोंदणी अर्ज सुपूर्द केले

कोल्हापूर :-शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरामध्ये शिवसेना सदस्य नोंदणीअभियान राबवण्यात येत आहे. कोल्हापुरात देखील सदर अभियान राबवण्यात येत असून आज कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 15000 हून अधिक सदस्यांचे नोंदणी अर्ज आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी जमा केले.

गेल्या अडीच वर्षातील तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय, नागरिकांसाठी दिलेल्या अनेक सवलती, नागरिक संकटामध्ये असताना वेळोवेळी केलेली मदत, वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून लोकांना झालेली मदत यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये शिवसेनेचे एक वेगळे घट्ट नाते तयार झाले आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षातील अनेक दिग्गज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. राजकीय पक्षातील नेत्यांसोबतच अनेक नागरिक शिवसेनेचे सदस्य होण्यासाठी इच्छुक आहेत, यासाठीच राज्यभरामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे.
कोल्हापुरात देखील महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सदर अभियानाची घोषणा होताच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क साधून स्वयंस्फूर्तीने सदस्य नोंदणी अर्ज भरले आज सदर सदस्य नोंदणी अर्ज आमदार क्षीरसागर यांच्याकडे सोपवण्यात आले..

यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. अमरजा पाटील, उपशहर प्रमुख सुरेश माने, फेरीवाला संघटना शहर प्रमुख विजय जाधव, महिला आघाडी उपशहर प्रमुख सौ. प्रीती अतिग्रे, सौ. राधिका पारखे,सौ. पूजा आरदांडे, सौ. सना अत्तार, सामाजिक कार्यकर्ते फिरोज अत्तार आदी उपस्थित होते.

🤙 9921334545