कुंभोज (विनोद शिंगे)
माणगाव स्पर्श भूमी येथील प्रवेशद्वार कमानी संदर्भात समाजकल्याण आयुक्त मा. सचिन साळे यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी समाजकल्याण आयुक्त सचिन साळे साहेब यांनी सांगितले की संबंधित प्रवेशद्वार कमानी बाबतीत गेले ३ वर्षे पत्रव्यवहार सुरू आहेत.संबंधित कमानी साठी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत साहेब, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार तसेच आंबेडकरी विचारवंत प्रकाशक प्रदिप आगलावे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या कमानीचा आलेख आणि कामकाज सुरू आहे.
तसेच या कमानी वर बौध्द स्तुपाचे शिलालेख असून डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावासाठी स्वतंत्र कोनशिला तयार केली आहे त्यावर सुसज्ज अशा पध्दतीने नाव तयार करण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण आयुक्त सचिन साळे साहेब यांनी दिली.
संबंधित कमानी साठी माणगाव बौध्द समाजातून एकाही व्यक्तिचा विरोध नसून एक बैठक हि पार पडली आहे.तरीही काही शंका तक्रार असल्यास उद्या या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये बैठक आयोजित केली असून आपणही उपस्थित रहावे असे आवाहन केले.यावेळी आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुहास हुपरीकर .भादोले गावचे युवा नेतृत्व मा.रमेश कांबळे आदी उपस्थित होते.