कुंभोज (विनोद शिंगे)
तुरुकवाडी (ता.शाहूवाडी) येथे नव्याने बांधलेल्या बौद्ध विहारामध्ये ६ फूट उंचीची थायलंड वरून आणलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत बौद्ध वस्तीमध्ये बौद्ध विहार बांधण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या बौद्ध विहाराचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले,शाहूवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती बबन पाटील,अशोक कुंभार (सर),जांबूर गावचे सरपंच दिलिप निकम,वडगांवचे उपसरपंच धनाजी थोरात,विरळे गावचे माजी सरपंच कृष्णा पाटील,आर.एस.पाटील,दिनकर पाटील,हंबीरराव पाटील,पांडुरंग माईंगडे,विलास हरी पाटील,सूर्यकांत पाटील,अरुण कुमार पाटील,बाळासाहेब पाटील यांच्यासह बौद्ध विकास मंडळ तुरुकवाडी – मुंबईचे सर्व पदाधिकारी व बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.