आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते हिमालय सर करणाऱ्या मराठा हायकर्स संघाचा गौरव

कोल्हापूर : इचलकरंजी येथील मराठा हायकर्स या संघाने हिमालय पर्वत सर करून इचलकरंजी शहराच्या नावलौकिकात मोलाची भर घातली. या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी देवांग मंदिर, मंगळवार पेठ, इचलकरंजी येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या सोहळ्यात आ. राहुल आवाडे हस्ते मराठा हायकर्सच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी संघाच्या धैर्याचे आणि प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले आणि पुढील साहसांसाठी शुभेच्छा दिल्या.
अशा प्रेरणादायी कार्यासाठी युवा वर्गाने पुढे यावे, असे आवाहन आमदार आवाडे यांनी यावेळी केले.

🤙 9921334545