कोल्हापूर : कबनूर ग्रामपंचायतीमध्ये आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.
यावेळी जलजीवन योजना, घरकुल योजना, घनकचरा प्रकल्प यासह अनेक महत्त्वाच्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीचा आढावा घेत पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शनही त्यांनी केले.
यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.