कुंभोज (विनोद शिंगे)
हातकलंगले तालुका संजय गांधी निराधार कमिटीची मुदत नुकतीच संपली असून सदर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. परिणामी नूतन आमदार दलित मित्रा अशोकरावजी माने व विद्यमान खासदार धैर्यशील माने लवकरच सदर कमिटी स्थापन करणार असून सदर कमिटीच्या अध्यक्षपदी आमदार अशोकराव माने गटाचे कट्टर समर्थक उद्योगपती धनंजय टारे यांची वर्णी निश्चित मानली जात असून, त्यांच्या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक व अशोकरावजी माने ग्रुपचे अध्यक्ष विजयसिंह माने भैया यांनी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे. नुतन संचालक मंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
परिणामी आकाराने व विस्ताराने मोठ्या असणाऱ्या कुंभोज गावाला मागील संजय गांधी निराधार कमिटी मध्ये दोन संचालक मिळाले होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश भोसले व जनसुराज्य पक्षाच्या वतीने अमोल गावडे यांची वणी लागली होती. तसेच हिंगणगावचे माजी सरपंच संजय देसाई यांचीही वर्णी लागली होती. परिणामी या सर्वांचा कार्यकाल उल्लेखनीय ठरला असून त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक निराधार महिलांना संजय गांधी योजनेच्या माध्यमातून आधार देण्याची काम करण्यात आले परिणामी आता नव्याने निवडण्यात येणाऱ्या कमिटीत पुन्हा एकदा जुन्या संचालकांना संधी द्यावी अशी मागणी नागरिकांत होत असली तरीही सध्या शिंदे गट ,पवार गट, भाजप व जनसुराज्य पक्षाचा कार्यकर्त्यांच्यातून संचालक पदासाठी मागणी वाढली असून नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. येत्या काही दिवसात हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार कमिटीची घोषणा विद्यमान आमदार अशोकराव माने व खासदार धैयशील माने यांच्या नेतृत्वाखाली केली जाईल त्यासाठी आमदार राहुल आवाडे व आमदार अमल महाडिक यांचे सहकार्य मिळेल अशी चर्चा व्यक्त होत आहेत .
परिणामी अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये अनेक नावे असली तरी सध्या मात्र सोशल मीडिया व राजकीय कार्यकर्त्यांच्या तोंडातून उद्योगपती धनंजय टारे यांच्या नावाची चर्चा असून अध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असे चित्र दिसत आहे. तसेच कुंभोज परिसरातून संजय गांधी निराधार कमिटीत जुन्या लोकांना संधी मिळणार की नवीन चेहरे नियुक्त होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.