आ.राहुल आवाडे यांच्या हस्ते इचलकरंजीत विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीतून, प्र.क्र. २५ – भाजपा कार्यालय ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मुख्य मार्गाच्या उजव्या बाजूला गटार बांधकामाच्या कामाचा शुभारंभ दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.

 

या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार राहुल आवाडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन कामास सुरुवात झाली.
या वेळी खासदार धैर्यशील माने, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, उपायुक्त राहुल मढेकर, अशोक कुंभार, नंदू परळकर, अतिरीक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपशहर अभियंता बाजीराव कांबळे, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, तसेच विविध स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545