आ. राहुल आवाडेंच्या उपस्थितीत महेश नवमी निमित्त भव्य शोभायात्रा

कोल्हापूर : महेश सेवा समितीच्या वतीने आयोजित महेश नवमी निमित्त भव्य शोभायात्रा भक्तिभाव आणि जल्लोषात पार पडली. या पावन प्रसंगी महेश सेवा समितीच्या कार्यालयात आमदार राहुल आवाडे हे उपस्थित राहून भगवान महेश यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि नम्र अभिवादन केले.

शोभायात्रेला एक वेगळेच आध्यात्मिक आणि सामाजिक महत्व प्राप्त झाले. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे उपस्थित भाविकांमध्ये श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. सजवलेले रथ, भजनी मंडळे, पारंपरिक वाद्यं व लोककला यांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
यावेळी आयोजित रक्तदान शिबिरालाही भेट दिली, यामुळे कार्यक्रमाचे सामाजिक भान अधोरेखित झाले.

🤙 9921334545