शेती व दुग्ध व्यवसायास नेहमीच पाठबळ देऊ : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : श्री. महादेव सह.दूध व्याव. व कृषिपूरक सेवा संस्था, मर्या., शिये या संस्थेच्या निवडणुकीमध्ये संचालक मंडळाने एकहाती सत्ता मिळवली आहे. यानिमित्त नूतन संचालकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्क कार्यालयात येऊन घेतली भेट. यावेळी सर्वांचे अभिनंदन केले.

शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिलं जातं. या संस्थेच्या सर्व सभासदांचे हित जपण्याकरता पुढील काळात चांगले कार्य करण्यासाठी नेहमीच पाठबळ देऊ, असा विश्वास यावेळी त्यांना दिला. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे नूतन संचालक अक्षय एकनाथ पाटील, पंकज पिलाजी मगदूम, . स्वप्नील सुनील पाटील, स्वागत विलास गुरव, सदाशिव दत्तू मोरे, बाबासो रायगोंडा पाटील तसेच जयसिंग आनंदा पाटील, योगेश सर्जेराव पाटील, आनंदा पाटील उपस्थित होते.

🤙 9921334545