जलजीवन मिशन योजना अंतर्गत पाणीपुरवठा आढावा बैठक

कुंभोज (विनोद शिंगे)
पंचायत समिती कार्यालय, हातकणंगले येथे हातकणंगले तालुक्यातील जल जीवन मिशन योजना अंतर्गत अद्याप अपूर्ण असलेल्या तसेच सुधारित प्रस्ताव सादर केलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात 28य गावातील आढावा बैठक आमदार अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ जलजीवन मिशन योजने अंतर्गत अपूर्ण असलेल्या कामांना गती देऊन ते पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीस व गट विकास अधिकारी शबाना मोकाशी मॅडम, उपअभियंता (ग्रा. पा.पु )एस बी. कुलकर्णी, शाखा अभियंता वसगडेकर, शेटके यांच्यासह सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज

🤙 9921334545