कुंभोज (विनोद शिंगे)
नरंदे (ता.हातकणंगले)येथे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर डॉ. संभाजी बन्रे ( फोर्स करिअर अकॅडमी नरंदे येथे आयोजित करण्यात आले होते.
या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरास हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी भेट दिली तसेच फोर्स करिअर अकॅडमी नरंदे यांच्यावतीने आमदार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित फोर्स करियर अकॅडमीचे संस्थापक डॉ. संभाजी बन्ने , नरंदे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच रवींद्र अनुसे ,नरंदेचे डेपोटी सरपंच संदीप भंडारी ,भारतीय जनता पार्टी (युवा) मोर्चा कोल्हापुर जिल्हा सरचिटणीस नामदेव सातपुते ,सौरभ रजपूत,फोर्स करिअर अकॅडमीच्या मुख्याध्यापिका निकिता बन्ने , प्रज्योत रसाळ ,शंभूराज नलवडे ,गौरी कित्तूर ,सानिका भिसे उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज