कोल्हापूर :इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रोजगार मेळावा राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम आमदार राहुल आवाडे, महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील आणि माजी परराष्ट्र सचिव,भारत सरकार ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, सहा.आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलतर्फे सहभागी झालेले सदस्य: रो. सतीश पाटील (अध्यक्ष),रो. नागेश दिवटे, रो. प्रमोद महाजन, रो. श्यामसुंदर मर्दा, रो. विमल बंब, रो. शिवकुमार धड्ड, रो. संजय होगाड़े, रो. प्रदीप गांधी, ज्ञानेश्वर मुळे फौंडेशनतर्फे: संजय मुळे, नेहा कुंभार, नितिन माने, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हचे पदाधिकारी, प्रेसिडेंट रो. गणेश निकम, सेक्रेटरी रो. विवेक हसबे, रो. सतीश मेटे,रो. गिरीश कुलकर्णी, रो. शीतल उपाध्ये, रो. अमित खानाज, रो. सुनील मांगलेकर, रो. सचिन सुतार, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटीचे मान्यवर सदस्य रो. आरती मंगलानी,रो. आभा धांदानिया, रो. अनुपकुमार धांदानिया, रो. बिना बगाडीया, रो. निनु लांबा, रो. मदनमोहन राठी, रो. ओमजी पाटनी, रो. पन्नालाल डाळ्या, रो. प्रभा मर्दा, रो. रिषभ जैन, रो. सुरिंदर मंगलानी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.