आ.राजेश क्षीरसागर यांनी साधला नागरिकांशी संवाद

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील जिव्हाळा कॉलनी परिसर येथे आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट दिली. भागातील माता-भगिनींनी यावेळी औक्षण करून स्वागत केले. तसेच विधानसभेतील विजयाबद्दल भागातील नागरिकांनी अभिनंदन केले. 

यावेळी नागरिकांनी सदर भागातील कचरा उठाव, उत्तरेश्वर पेठेकडे जाणारा खराब रस्ता, पाणीपुरवठ्याचा प्रश्न आदी विषय आ. क्षीरसागर यांच्यासमोर मांडले. या चर्चेदरम्यान सदर समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी मनपा प्रशासन आणि अधिकारी वर्गाला आदेश देऊन सदर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन नागरिकांना दिले.
सदर भेटीदरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्राताई रंगणेकर, वेताळ तालमीचे अध्यक्ष अजित चव्हाण, गणेश रांगणेकर तसेच जिव्हाळा कॉलनी भागातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

🤙 9921334545