दलित मित्र आमदार अशोकराव माने यांचे कार्य उल्लेखनीय -पालकमंत्री प्रकाश अबिटकर

कुंभोज (विनोद शिंगे)
शिरोळ येथे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर व आमदार डॉ.विनय कोरे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

तसेच दलितमित्र डॉ.अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान व शिरोळ नगरपरिषद यांच्या वतीने श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका व शिरोळ जनता हायस्कूल व जुनिअर कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती पुष्पा दत्त कळेकर तसेच शिरोळ गटशिक्षणाधिकारी सौ.भारती सुनिल कोळी यांना शिरोळ भूषण पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर व आमदार डॉ.विनय कोरेव सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले..

यावेळी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर,माजी आमदार उल्हास दादा पाटील,अखिल भारतीय शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान अध्यक्ष रावसाहेब देसाई,माजी जि.प. सदस्य अरुणराव इंगवले,कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने (भैय्या),शिरोळचे मा.नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील,माजी जि.प.सदस्य प्रसाद खोबरे,विजय भोजे,शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविंद्र माने,जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने,भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डाॅ.अरविंद माने,तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विश्वास माने (आप्पा),सरपंच संगीता नरंदे,स्विय सहायक सुहास राजमाने,दिनकर ससे,पृथ्वीराज यादव,सलीम मुल्लाणी बबन बन्ने, सागर कोळी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर,पदाधिकारी,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545