कोल्हापूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाज बांधवाच्या उपस्थितीत नाभिक समाजातील विवाह इच्छुक वधु – वरांच्या परिचयासाठी व भावी जिवनाच्या रेशीम गाठी घट्ट व्हाव्यात यासाठी राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा मुस्कान लॉन कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून यावेळी महाराष्ट्र भरातुन नाभिक बांधव यांची उपस्थिती होती .
नाभिक समाजातील वधु – वरांच्या रेशीम गाठी घट्ट होऊन इच्छुकांचे विवाह जुळवणी सोपी व सोईकर व्हावी यासाठी वधु वर व त्यांच्या पालकांना एकत्र आणण्याचा मानस मनात ठेवून महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा कोल्हापुर यांनी महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय वधु – वर पालक परिचय मेळावा २०२५ चे आयोजन शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात आले होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सयाजीराव झुंजार प्रदेश अध्यक्ष हे होते . उद्घाटक म्हणून दत्तात्रय अनारसे माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून . सुधीर उर्फ बंडू राऊत माजी प्रदेश कार्याध्यक्ष नागपुर हे होते . यावेळी प्रदेश अध्यक्ष सरचिटणीस व कोल्हापुर जिल्हाध्यक्ष यांनी पदाची शपथ ग्रहण केली यावेळी सोमनाथ साळोखे प्रदेश उपाध्यक्ष सांगली . विष्णुजी वखरे प्रदेश उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर ,बाळासाहेब व्यवाहारे शिर्डी , महादेव चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष रत्नागिरी , जयवंत सुर्यवंशी जिल्हा अध्यक्ष सांगली , डॉ अविनाश काशीद प्रदेश संघटक, सातारा ., एम. आर. टिपुगडे प्रदेश मार्गदर्शक , दिलीप आनार्थे माजी प्रदेश सरचिटणीस, छत्रपती संभाजीनगर , दादासाहेब काळे जेष्ठ पत्रकार छत्रपती संभाजीनगर मराठवाडा उपाध्यक्ष कचरू जाधव , संभाजी नगर जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी विजय कुमार मोरे यांच्या सह प्रमुख उपस्थितीमध्ये , नारायण पोवार अध्यक्ष श्री सेना नाभिक विद्यार्थी गृह , राजाराम शिंदे, अध्यक्ष संत सेना महाराज गृह निर्माण संस्था प्रविणसिंह यादव मा. सभापती शिक्षण व अर्थ समिती जि.प. कोल्हापूर , उदय माने अध्यक्ष करवीर नामिक क्रेडिट सोसायटी. , विजय कोरे वधू वर कमिटी अध्यक्ष , बाबासाहेब काशीद विभागीय अध्यक्ष , मेधाराणी जाधव महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा , दिंगबर टिपुगडे सर जिल्हा कार्याध्यक्ष , मयुर रोकडे जिल्हा सरचिटणीस ,. शर्वरी काशीद महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष , मनोहर झेंडे बापु मा. अध्यक्ष दुकान मालक संघ , मोहनराव चव्हाण अध्यक्ष युवक संघटना , श्रीकांत झेंडे अध्यक्ष दुकान मालक संघ , महेशराव चव्हाण मा. जि. प. सदस्य , सचिन जाधव जिल्हा मार्गदर्शक
हे असणार आहेत तर कार्यक्रमाचे संयोजक म्हणून
मारुती टिपुगडे आबा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, अनिल संकपाळ जिल्हा कोषाध्यक्ष
, सुनिल इंगळे जिल्हा कार्याध्यक्ष , कविता जाधव महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष , भाग्यश्री सुर्यवंशी महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस यांच्यासह सर्व जिल्हा उपाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व समाज बांधव कोल्हापूर जिल्हा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले . साजन माने हे कोल्हापुरातील फुल विक्रेते असून त्यांचा समाज कार्यात नेहमीच भरीव योगदान असते त्यांनी यावेळी मंदीर बांधकामासाठी रोख ५० हजार रुपये कमेटी सदस्यां कडे सुपूर्त केले . यावेळी कोल्हापुर नाभिक महामंडळ शाखेतर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाचे सुत्र संचलंन डिंगाबर टिपुगडे व श्रीमती पल्लवी चौगुले यांनी केले