इचलकरंजी शहरात विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी यांच्या वतीने संचलन

कोल्हापूर : इचलकरंजी शहरात विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत एक भव्य व शिस्तबद्ध संचलन आयोजित करण्यात आले. या संचलनात विविध भागांतील दुर्गा वाहिनीच्या सदस्यांनी पारंपरिक वेशभूषा, देशभक्तिपर घोषवाक्ये आणि अनुशासित पद्धतीने सहभाग घेतला.

     

 

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात आमदार राहुल आवाडे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. या क्षणाने उपस्थितांमध्ये अभिमान व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमास विविध मान्यवर, संघटनांचे पदाधिकारी, शहरातील नागरिक व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजी शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरलेले हे संचलन यशस्वी करण्यासाठी आयोजकांचे विशेष योगदान राहिले.

🤙 9921334545