कुंभोज (विनोद शिंगे)
वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) चेअरमन पदी नाविद हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
तसेच आमदार डॉ.विनय कोरे यांनी .नाविद हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने,गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील(भाऊ),विश्वास पाटील (आबाजी),किसन चौगुले,युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.