कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या वतीने, तसेच आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांतून जिवित नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच, पूरवठा सुरक्षा संच व अत्यावश्यक संच वितरित करण्यात आले.
हा वितरण समारंभ घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे आमदार राहुल आवाडे हस्ते संपन्न झाला.
वितरण समारंभात मुकुंद पोवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ, प्रमोद पोवार चेअरमन को.जि.मजूर संघ ,कामगार प्रतिनिधी मदन मुरगुडे, बंडा सातपुते, राजू निकम, अनिल जाधव, अशोक सुतार, अभिजीत आवळे, बच्चन कांबळे, संगीता सिंग, सत्यजित शोएब शेख, मुजावर साहेब उपस्थित होते.