आ. राहुल आवाडेंच्या हस्ते श्रद्धा ऑलिंपियाड शाळेच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

कोल्हापूर : श्रद्धा ऑलिंपियाड स्कूल या शिक्षण संस्थेच्या वतीने, शाळेच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रद्धा ऑलिंपियाड स्कूलने आपला यशस्वी ८ वर्षांचा प्रवास साजरा करत केक कटिंग सोहळा आयोजित केला होता.

या विशेष सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल आवाडे उपस्थित होते . आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. आणि शाळेच्या ८ वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा केक कटिंगद्वारे स्मरणीय केला गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ए.आर.तांबे होते. यावेळी डायरेक्टर अक्षय तांबे आणि प्राचार्या प्रियांका , दादासो भाटले, सचिन हिरवाडे, इमरान मकानदार व्यासपीठावर मान्यवर पाहुण्यांच्या रूपात उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी श्रद्धा ऑलिंपियाड स्कूलच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे आणि व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमात पालक, शिक्षक, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकात्मता, समर्पण आणि गुणवत्तेच्या मूलभूत मूल्यांवर उभ्या असलेल्या श्रद्धा ऑलिंपियाड स्कूलचा हा ८ वर्षांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

🤙 9921334545