उद्योगमंत्र्यांच्या हस्ते शिवसेना मदत कक्ष कोल्हापूरच्या वतीने पत्रकार राजेंद्र मकोटे यांचा  सत्कार

कुंभोज  (विनोद शिंगे)
कोल्हापुर शहराच्या मिडिया व आरोग्य क्षेत्रात गेली दोन दशके, अत्यंत निस्वार्थीपणे आरोग्यमित्राची उत्तम सेवा बजावणारे महनीय व्यक्तीमत्व, आरोग्य दूत, पत्रकार राजेंद्र मकोटे यांचा सत्कार उद्योग मंत्री उदय सामंत व आमदार राजेश क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.

                     

शिवसेना मदत कक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्र आरोग्य दूत संम्मेलनात हा सत्कार करण्यात आला. यावेळी मँगो एफ एम चे प्रमुख आशिष कदम यांचाही सत्कार करण्यात आला. शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या सत्काराचे स्वरूप होते.
आरोग्य दूत पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी आपल्या प्रदिर्घ वाटचालीत सातत्याने पत्रकारितेबरोबरच आरोग्य प्रबोधन सुरू ठेवले आहे. रक्तदाता, देहदान,नेत्रदान आदि बाबत जनतेला सातत्याने समुपदेशन सुरू ठेवले आहे.

सीपीआर हॉस्पीटल कोल्हापूर, सिध्दगिरी हॉस्पीटल कणेरी मठ, वालावलकर हॉस्पीटल कोल्हापूर यांच्या माध्यमातून ४०० हुन अधिक वेळा रक्तदान शिबिराचे संयोजन केले आहे तर स्वत: ८० हून अधिक वेळा रक्तदान केले आहे.आरोग्य दूत राजेंद्र मकोटे यांच्या या अखंडित कार्याची दखल या शिवसेना मदत कक्षाने घेतली.व त्याचा हा यथोचित असा सत्कार केला.यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आणि आरोग्यमित्र राज्यश्री राज्य संयोजक मंगेश चिवटे प्रमुख प्रशांत साळुंखे

शेती अभ्यासक जालंदर पाटील माजी आमदार सुजित मिणचेकर आदी मान्यवर उपस्थित होते .

🤙 9921334545