४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्व्हेक्षणाला केंद्र सरकारची मान्यता, रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे खासदार धनंजय महाडिक यांचे अभिनंदन

कोल्हापूर: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या मागणीला यश आले आहे. सुमारे ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व्हावे, यासाठी सर्व्हेक्षण करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

 

त्यामुळे कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे लवकरच दुपदरीकरण होईल आणि अनेक नव्या गाडया कोल्हापुरातून सुरू होतील, यासाठी आणखी एक पाऊल उचलले गेले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे खासदार महाडिक यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्ग एकेरी असल्याने गाडयांचे क्रॉसिंग, रेल्वे गाडयांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढवण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.  त्याचा परिपाक म्हणून केंद्र सरकारने मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्व्हेक्षण करण्यास मंजूरी दिली आहे. त्यातून एकप्रकारे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण होणार, याचे संकेत मिळाले आहेत. वंदे भारतसह नव्या रेल्वे गाडया कोल्हापुरातून सुरू करण्यासाठी दुपदरीकरण होणे अत्यावश्यक आहे. सर्व्हेक्षण झाल्यानंतर लवकरच दुपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे. तर कोल्हापुरातील रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे खासदार महाडिक यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

🤙 9921334545