मुंबई : आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त बैठक आयोजित करण्यात आला होता . या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार अभिजित पाटील, तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत खालील विषयांवर चर्चा झाली :
राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरकडे येणाऱ्या दोन्ही प्रमुख पालखी मार्गांवरील आरोग्य व्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, पाणीपुरवठा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
707 रुग्णवाहिका 24 तास कार्यरत, 87 अतिदक्षता कक्ष, 158 स्त्रीरोग तज्ञ, 136 हिरकणी कक्ष, आणि 212 आरोग्यदूतांची नेमणूक अशी व्यापक आरोग्य व्यवस्था उभी करण्यात आली आहे.
प्रत्येक 5 किमीवर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ दवाखाना, व पालखी मार्गावरील सर्व खासगी हॉस्पिटल्समध्ये 10% खाटांची राखीव व्यवस्था तैनात असणार.
मार्गावरील हॉटेल, धाब्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी, पाण्याचे निर्जंतुकीकरण, आणि प्रत्येक रुग्णालयाला औषध साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या बैठकीत मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, वारी करताना कोणत्याही वारकऱ्याला आरोग्यसेवेअभावी त्रास होणार नाही याची हमी शासन घेईल.
वारकरी ही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, आणि त्यांची सेवा हा आपला आदर आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आम्ही सर्व तयारी पूर्ण केली आहे, आणि यंदाची वारी ही खऱ्या अर्थाने एक “आनंदवारी” ठरणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
यावेळी ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर ,राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अभिजित पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पंढरपूर देवस्थान समितीचे प्रमुख गहिनीमहाराज औसेकर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे विश्वस्त योगी निरंजनदास महाराज, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे तसेच विविध संतांच्या दिड्यांचे प्रमुख विश्वस्त तसेच धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.