शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

 

 

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, एम.ए. मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. जयप्रकाश पाटील यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

🤙 9921334545