आ. सतेज पाटील यांच्याकडून शिये येथील राजा शिवछत्रपती स्थानिक सहकार आघाडीचे अभिनंदन

कोल्हापूर : शिये येथील श्री महादेव सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्थेच्या राजा शिवछत्रपती स्थानिक सहकार आघाडीच्या नूतन संचालक मंडळ सदस्यांनी आमदार सतेज पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे यांची उपस्थिती होती. यावेळी सतेज पाटील यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन करून त्यांना आणि संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके यांच्यासह बाजीराव पाटील, हणमंत पाटील, विकास चौगले, तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग पाटील, दत्तात्रय शिंदे, एम. डी. पाटील, चेअरमन सुदर्शन गाडवे, शहाजी काशीद, प्रवीण चौगुले, विश्वनाथ पाटील, प्रभाकर काशीद, उपसरपंच विलास गुरव, यांच्यासह महादेव दूध संस्थेचे सर्व नूतन संचालक उपस्थित होते.

🤙 9921334545