गणित विषयासह शिक्षणप्रक्रियेत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या  गणितायनला मान्यता 

कुंभोज (विनोद शिंगे)

गणित विषयासह शिक्षणप्रक्रियेत नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या गणितायन या अनोख्या प्रयोगशाळेने आता विविध स्तरांवरील अभ्यासक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आहे. याच सकारात्मक प्रवाहात एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी घटना घडली – हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे विद्यमान संचालक  डॉ. सुजित मिणचेकर यांनी गणितायनचे माहितीपत्रक अभ्यासल्यानंतर या प्रयोगशाळेला प्रत्यक्ष भेट देण्याची उत्सुकता व इच्छा व्यक्त केली आहे.

ही गोष्ट केवळ आनंदाची नाही, तर अत्यंत आश्वासक आहे. डॉ. मिणचेकर स्वतः शिक्षण, विज्ञान व ग्रामीण प्रगतीच्या संदर्भात संवेदनशील दृष्टिकोन ठेवणारे नेतृत्व आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांनी गणितायनमधील प्रत्येक उपक्रम, वस्तुसंग्रह आणि विद्यार्थ्यांवरील प्रभाव याची सखोल दखल घेतली.

त्यांनी ही लॅब प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे डॉ. शेटे सरांच्या कार्याला सामाजिक व राजकीय पाठबळ मिळण्याची दारं खुली होत आहेत. यामुळे प्रयोगशाळेच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य, मान्यता आणि प्रसार निश्चितच वेग घेतील.

गणितायन ही आता केवळ एक शैक्षणिक प्रयोगशाळा न राहता, महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीची दिशा दर्शवणारा आदर्श ठरत आहे — आणि यात मिणचेकर यांचा अभ्यासपूर्ण दृष्टीकोनाची भूमिका निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

🤙 9921334545