कोल्हापूर: दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलान चोख प्रत्युत्तर दिले त्यामुळे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काँग्रेसवर टीका करून विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा मूळ विषयावर त्यानी बोलावे असा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ते तिरंगा यात्रेवेळी पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्यदल जे पाऊल उचलेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल. त्यामुळे सैन्य दलाच्या सन्मानार्थ काँग्रेसच्या कडून आम्ही तिरंगा यात्रा काढत असल्याचे त्यांनी सांगितले. पहलगाम हल्ल्यानंतर, भाजपकडून सातत्याने काँग्रेसवर टिका करण्यात येत असल्याने यावर बोलतांना त्यांनी जे सत्य आहे ते जनतेसमोर आले पाहिजे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही प्रश्न संसदेत उपस्थित केले. विशेष अधिवेशन बोलवण्याची
काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. यावर भाजपने बोलले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेसवर होत असलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी, काँग्रेसवर टीका करून पहलगाम हल्ल्याचा विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा त्यांनी मूळ विषयावर बोलावे. असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
काँग्रेस म्हणून सैन्य दलाला पाठबळ देणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणे ही काँग्रेसची भूमिका असल्याचेही आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. शस्त्र संधी देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर करणे गरजेच असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत पाकिस्तान मधील शस्त्र संधी जाहीर करतात. हे दुर्दैवी आहे. जनतेसमोर ही सर्व माहिती आली पाहिजे. या मुद्द्यावर लोकसभेत देखील चर्चा झाली पाहिजे. शस्त्रसंधी बाबत जे निर्णय घेण्यात आले ते उघडपणे सांगितले पाहिजे. पहलगाम हल्ल्याचे राजकारण करून भाजपकडून गांधी परिवारावर होत असलेली टीका दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले.गांधी परिवाराचे देशासाठीच बलिदान संपूर्ण जनतेला माहिती आहे. हे पुसून टाकण्यासाठी भाजपकडून सातत्याने . परिवार आणि काँग्रेसवर टीका होत आहे. मात्र देशातील जनता सुज्ञ आहे खरं काय आणि खोटं काय जनतेला. माहित आहे. असेही त्यांनी सांगितले.
देशाच्या सैनिकांनी जीवाची बाजी लावून, पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर दि. मात्र भाजपचे काही मंत्री सैनिकांच्या प्रती आक्षेपार्ह विधान करत आहेत. भाजपचे मंत्री विजय शहा यांचे विधान पाहता, भाजपने त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेणे अपेक्षित होते. मात्र केवळ सैनिकांच्या प्रति भावना दाखवण्यासाठी भाजप कडून तिरंगा रॅली काढण्यात येते. मात्र आम्ही प्रत्यक्ष सैनिकांच्या सोबत आहोत. असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी बोलताना खास. शाहु महाराज यांनी, भाजपने ऑपरेशन सिंदूरला राजकीय स्वरूप देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत, भाजपकडून पहलगाम हल्ल्याचे राजकारण होत असल्याबाबत खासदार शाहू महाराजांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दहशतवादी हल्ल्यामागील सर्व सत्य बाहेर आले पाहिजे. संसदेचे विशेष अधिवेशनाची मागणी काँग्रेसने केली आहे. मात्र त्याला अद्यापही तारीख मिळाली नसल्याचही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या तिरंगा यात्रे वेळी, माजी सैनिकांचाही मोठा सन्मान राखण्यात आला. यात्रेच्या सुरुवातीस माजी सैनिक होते. हे यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाच्या झेंडा ऐवजी, काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने हातात तिरंगा घेत, भारत माता… जयच्या घोषणा देत…. एक प्रकारे सैनिकांचेही मनोधैर्य वाढवण्याच काम केले.